पालघर जिल्ह्यात रेड-अलर्ट जारी.. शनिवारी शाळा कॉलेज बंद.. नागरिकांनी सतर्क रहावे जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांचे नागरिकांना आवाहन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात शनिवार दिनांक 26 जुलै रोजी रेड-अलर्टचा इशारा जारी केला आहे .
या कारणास्तव पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय कॉलेज शाळा अंगणवाड्या यांना शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
कारण येत्या 24 तासात पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे. असा इशारा जिल्हा कृषी हवामान केंद्र कृषी विज्ञान केंद्र कोसबाड जिल्हा पालघर खात्याकडून देण्यात आला आहे.तसेच या जिल्ह्यातील वैतरणा, मोडकसागर, तानसा ही धरणे शंभर टक्के पाण्याने भरल्या असल्या कारणामुळे या धरणातील पाणी सोडण्यात आले आहे.
यामुळे दक्षता पूर्व तयारी म्हणून पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करून महाविद्यालय शाळा कॉलेज अंगणवाडी यांना शनिवारी सुट्टी देण्यात आली आहे
या कालावधीत सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपापल्या कार्यालयात वेळेवर उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनेच्या कासकामात सहकार्य करावे असे सक्त आदेश देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर नागरिकांनी आवश्यकता नसल्यास बिन-कामी घराबाहेर पडू नये व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व विशेष करून नदीकाठच्या गावांनी व पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सावध सतर्क राहून नदीपात्रात किंवा धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे



