महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण प्रेरणामास अभियान….. शिक्षक सेनेचा वतीने विक्रमगड येथे वृक्षारोपण

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या रविवार दिनांक 27 जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यात 27 जून ते 27 जुलै 2025 या एक महिन्याच्या कालावधीत वृक्षारोपण प्रेरणामास अभियान शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून राबवला जात आहे.

या अभियाना अंतर्गत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील तलवाडा हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे बुधवार दिनांक 23 जुलै 2025 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर प्रसंगी डहाणू विधानसभा संघटक तानाजी काकडे , डहाणू शहरप्रमुख प्रदीप लिमये तसेच पालघर जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष संजय पाटील व तलवाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद तसेच शशिकांत पाटील सर, संतोष कामडी सर प्राथमिक मुख्याध्यापक, प्रदीप दोडे सर माध्यमिक मुख्याध्यापक तसेच जगदीश अहिरे , मंगेश साळुंखे सर व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button