शहर

वसई नायगाव येथील नवकार बिल्डिंगच्या बाराव्या मजल्यावरून खाली पडून 4 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

नायगाव पूर्व नवकार बिल्डिंगच्या बाराव्या मजल्यावरून खाली पडून एका चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.
ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजता घडली आहे.
वसई नायगाव पूर्व येथे 14 मजली नवकार बिल्डिंग आहे.

या बिल्डिंगच्या बाराव्या मजल्यावरील एका प्लेटमध्ये या बिल्डिंगमध्ये राहणारी चार वर्षाची अनविका प्रजापति मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी संध्याकाळी आठ वाजता तिच्या ओळखीच्या फ्लॅटमध्ये खेळण्यासाठी गेली होती.

ती खेळता खेळता फ्लॅटच्या गॅलरी जवळ ठेवलेल्या चप्पल स्टैंडवर चढली असता तिचा तोल जाऊन ती बाराव्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे तिच्या डोक्याला व संपूर्ण शरीराला जबरी मार लागला होता.

तिला उपचारासाठी नायगाव पूर्व येथील लोटस हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button