देवेंद्र फडणवीस यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने अकलूज येथे पार पडले भव्य रक्तदान शिबिर…

🎯 युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या सह जवळ जवळ 400 च्या वर रक्तदात्यांनी केले रक्तदान…
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
महाराष्ट्राचे तरुण तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने अकलूज येथे रणजितसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाच्या वतीने भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते…

अकलूज च्या ऐतिहासिक “विजय चौक” येथे आज मंगळवार दिनांक 22/07/2025 रोजी सकाळी 10 वाजले पासून संध्या 05 वाजे पर्यंत भव्य असे रक्तदान शिबीर पार पडले…

भव्य अशा रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,या वेळी अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील,कृष्णराज माने पाटील यांच्या सह अकलूज येथील ग्रामपंचायत चे आजी माजी सदस्य तसेच विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते…

युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले नंतर त्यांनी स्वतः या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले,सदरच्या रक्तदान शिबिरा बद्दलची शेवटची माहिती हाती आली तेंव्हा जवळ जवळ 417 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती रणजितसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले…
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे



