शहर

पालघर जिल्ह्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या पंखात बळ भरणारे मन रे फाउंडेशनच्या वतीने 100 विद्यार्थ्यांना 62 लाखाची शैक्षणिक मदत..

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

सर्वांनाच शिकण्याची इच्छा असते मात्र आर्थिक अडचणीमुळे शैक्षणिक शुल्क भरता येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित राहतात आणि नोकरीला लागून शिक्षण अर्धवट सोडावे लागते. अशा पालघर जिल्ह्यातील मुलांसाठी मन रे फाउंडेशन आशेचा किरण ठरला आहे.
नुकतीच त्यांनी पालघर जिल्ह्यातील शंभर विद्यार्थ्यांना सुमारे 62 लाख रुपयाची शैक्षणिक मदत करत त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले आले. व पुढील उच्च शिक्षणासाठी भविष्यात लागणारी मदत ही फाउंडेशन करेल तुम्ही शिकत रहा असा विश्वास फाउंडेशनच्या अध्यक्षा मानसी दलाल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

मन रे फाउंडेशन गेल्या 4 वर्षापासून पालघर जिल्ह्यातील खेडापाड्यातील विशेषतः जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी वर्षभराचं शैक्षणिक साहित्य त्याचप्रमाणे त्यांना लागणाऱ्या शालेय बॅग थंडीमध्ये आवश्यक असणारा स्वेटर या वस्तू या विद्यार्थ्यांना दिल्या जातात त्यांच्या या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळातील विद्यार्थी संख्येत वाढ झाल्याचे शिक्षकांनी दलाल यांना सांगितले. मात्र या वस्तू देताना विद्यार्थ्यांची 75 टक्के पेक्षा जास्त हजेरी आवश्यक असल्याचा नियम त्यांनी केला आहे त्यामुळे विद्यार्थीही शाळेमध्ये उपस्थित राहण्यासाठी तयार असतात. त्यामुळे पटसंख्याही वाढत आहे. आठवी नववी दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनी आपलं शिक्षण सोडत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या मागचं कारण शोधलं तर अनेकांना मासिक पाळी येत त्यावेळी त्यांच्याकडे वापरण्यासाठी सॅनिटरी पॅड नसतो त्यामुळे मुली शाळेत येणे टाळतात याकरिता त्यांनी मुलींना वर्षभराचे किट दिले. मात्र या किट बरोबरीनेच या विद्यार्थिनींनी शाळेत 90 टक्के उपस्थिती लावली पाहिजे हा नियम ही आखून दिला. असेही दलाल यांनी यावेळी सांगितले.

पैशाअभावी गरीब गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये त्यांचे शिक्षण सुरू राहिले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मनरे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 2020 पासून पालघर जिल्ह्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यास सुरुवात केली. यामध्ये खरोखरच ज्यांची परिस्थिती हालाखीची आहे. त्यांची शैक्षणिक शुल्क भरण्याची ऐपत नाही. अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना ती मदत देण्यात येते मदत देताना या शैक्षणिक संस्थेत ते विद्यार्थी शिकत आहेत त्या संस्थेच्या नावाने धनादेश देण्यात येतो सहा हजारापासून ते साधारण दोन ते अडीच लाख रुपयापर्यंतची विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क त्यांच्या संस्थेमार्फत भरले जाते तसेच ज्यांना पीएचडी करायची आहे किंवा अजून पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. त्यांनी शिक्षणात खंड न पाडता हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मनरे फाउंडेशन या विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचेही फाउंडेशनच्या अध्यक्षा मानसी दलाल यांनी सांगितले.

पालघर येथील जेनेसिस औद्योगिक वसाहतीमध्ये विद्यार्थ्यांना धनादेश वितरणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी मन रे फाउंडेशनचे अध्यक्षा मानसी दलाल, गौरव दलाल,उमरोळीचे सरपंच प्रभाकर, पाटील . ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पी एम पाटी, दांडेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक संतोष चुरी राजेशमणी त्रिपाठी विद्यार्थी त्यांचे पालक आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button