पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आणि करीअर मार्गदर्शन शिबीर पालघर येथे संपन्न..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यामध्ये सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये १ हजार रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्हयामध्ये या आर्थिक वर्षामध्ये जवळपास २० रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ,पालघर या कार्यालयामार्फत नियोजन करण्यात आलेले आहे.
सदर रोजगार मेळाव्याकरीता आमदार राजेंद्र गावित यांनी अध्यक्षपद भूषवुन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच उपस्थित बेरोजगार युवकांना पालघर जिल्हयामध्ये तसेच भविष्यात येणाऱ्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

रोजगार मेळावे जिल्हयातील तसेच महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात येणार असुन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , पालघर व यशवंतराव चाफेकर कॉलेज, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ जुलै २०२५ रोजी, यशवंतराव चाफेकर कॉलेज, पालघर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाबाबत माहिती दिली. त्यानंतर महेशकुमार सिडाम, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, पालघर यांनी वाढवण बंदराच्या अनुषंगाने जिल्हयामध्ये उपलब्ध होणाऱ्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

बेरोजगार युवकांना येणाऱ्या काळात कोणकोणत्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध होतील तसेच AI च्या भविष्यातील संधी याबाबत नॅशनल ज्युनीअर कालेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, वाडा व ऋषी कॉम्प्युटर एज्युकेशन, वसई येथे व्यवसाय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याकरीता किरण साळवे आणि सुरेखा भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले.




