क्राईम

पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलिसांनी सात लाख किमतीच्या अफूसह एक कार असा एकूण 15 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अफू या अमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या अज्ञात आरोपीवर मोखाडा पोलीस दलाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोखाडा पोलीस ठाणे क्षेत्रांमध्ये सोमवार दिनांक 21 जुलै रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास पोलीस हवालदार शशिकांत भोये व बापू नागरे हे रात्री गस्त घालत असताना मोखाडा त्रंबक रोडने एक क्रेटा कार क्रमांक MP -०९-CZ- ६६६९ या गाडीचा संशय आल्याने त्यांनी पाठलाग केला.
पाठलाग करत असताना मौजे चिंतूर गावाच्या जवळ कार चालकाने कार ची चावी काढून कार तिथेच सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला सदर कार तपासली असता कार मध्ये सात लाख 80 हजार 340 रुपये किमतीचा एकूण 111.420kg वजनाचा अफू वनस्पतीच्या सुखलेल्या बोंडाचा चुरा व बनावट नंबर प्लेट व आठ लाख रुपये किमतीची कार क्रेटा कार असे एकूण 15 लाख 80 हजार 340 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

मोखाडा पोलीस ठाण्यामध्ये गु.र.न. 119/2025 एनडीपीएसac ॲक्ट 1985 ची कलम 15 (क) व ८ (क) बी एन एस कलम 318, मो.वा. का कलम 144 प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी, प्रेमनाथ ढोले हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button