महाराष्ट्र

“पुरोगामी” म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र धोक्यात आहे का…?

यशवंतराव ते विलासराव पाहिलेली पिढी बावनकुळे आणि पडळकर यांना पाहून काय बोध घेत असेल…?

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज नेटवर्क अकलूज
9890299499

यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख साहेबां पर्यंतचा दैदिप्यमान राजकीय इतिहास वाचलेली आणि बघितलेली लोकं आपण परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळात संभाजी ब्रिगेड चे “प्रवीण गायकवाड” ते आमदार जितेंद्र आव्हाड यांचे “नितीन देशमुख” या कार्यकर्त्याना मिळालेली वागणूक “पुरोगामी” महाराष्ट्रा साठी अत्यंत धोक्याची घंटा आहे हे आज अधोरेखित झाले…

ज्या महाराष्ट्राने शेकाप चे गणपतराव देशमुख यांच्या सारखे सामान्य घरातील आमदार निवडून दिले त्याच महाराष्ट्राला बावनकुळे,पडळकर सारख्या खुनशी राजकारणी पहायला मिळत आहेत हि महाराष्ट्राची शोकांतिकाच आहे…

संभाजी ब्रिगेड चे प्रवीण गायकवाड साहेब आणि नितीन देशमुख यांच्या वर झालेला हल्ला हा महाराष्ट्राच्या “बहुजन” समाजावर झालेला हल्ला असुन किती दिवस आपण तरी स्वतः ला “पुरोगामी” म्हणून घेणार आहोत,जातीत वादी शक्तीची जी किड महाराष्ट्राला लागत चालली आहे ती किड अगोदर तुम्हा आम्हास काढावी लागेल तरच भविष्य काळात एकसंघ महाराष्ट्र पहायला मिळेल अन्यथा त्या 105 हुतात्म्या सारखे 1005 हुतात्मे झाले तरी हा “वणवा” विझणार नाही…

आत्ता ती वेळ आली आहे,समोरचा ज्या पद्धतीने विचार करत आहे अगदी तसाच विचार आपल्याला करावा लागणार आहे,जशास तसे उत्तर द्यायचे असेल तर आपल्याला हि त्यांचे सारखे थोडे तरी वागावे लागेल नाही तर प्रवीण गायकवाड,नितीन देशमुख यांच्या सारखे प्रकरणे एक दोन दिवसां आड महाराष्ट्रात घडत राहतील…

महाराष्ट्राच्या राजकारणात “मराठा” समाजाने नेहमी मोठ्या भावाची भुमिका पार पाडली असुन आपल्या सह सर्व समाज घटकांना सोबत घेऊन समाजकारण आणि राजकारण केले आहे,हे घडत असताना महाराष्ट्रातील सर्वच समाज घटकांनी मराठा समाजाला देखील तेवढीच तोलामोलाची साथ दिली आहे हे हि विसरून चालणार नाही…

महाराष्ट्राच्या विधान भवन प्रांगणात पडळकर यांच्या कार्यकर्त्या मार्फत जितेंद्र आव्हाड यांच्या नितीन देशमुख या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी नंतर पोलिसांनी नितीन देशमुख यांच्यावरच कारवाई करणे याला म्हणावे असा प्रश्न मात्र पडतो…

गेल्या काहीं दिवसांपासून महाराष्ट्रातील जातीय वादी शक्ती हे आक्रमक झालेली पहायला मिळत आहे,या नंतर महाराष्ट्राच्या वाट्याला आणखी काही पहायला मिळणार आहे हा संशोधनाचा विषय आहे,रोज रोज महाराष्ट्राच्या जनतेने आज “नेमकं काय घडणार” आहे याचाच विचार करायचा का…?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button