पालघर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे मोठ्या खड्ड्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) खड्ड्यांमुळे होत असलेल्या त्रासाचे प्रतीकात्मक दर्शन घडवण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या हातापायांना पट्ट्या बांधून बुधवार दिनांक 16 जुलै 2025 रोजी नगरपरिषदेला निवेदन देत नगर परिषदेच्या कार्यपद्धतीबद्दल निषेध व्यक्त केला..
मनसेच्या वतीने पालघर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांची भेट घेऊन शहरातील अनेक समस्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. यावेळी कामठे यांनी सर्व समस्यांमध्ये स्वतः लक्ष घालून त्या सोडवणार असल्याचे देण्यात आले .

या आंदोलनात मनसेचे पालघर उपजिल्हा संघटक मंगेश घरत, महिला तालुका अध्यक्ष हेमांगी राऊळ, तालुका सचिव निखिल गायकवाड, शहर सचिव हिमांशू राऊत, शहर संघटक हेमंत घोडके, उपशहर अध्यक्ष कार्तिक मैत्राणी, विभाग अध्यक्ष नयन पाटील, संजय चव्हाण, धवल आशर, गजानन खडके, आदित्य इंगोले, साहिल जगताप, संकेत साळुंखे, आशिष गायकवाड, जय वर्मा आणि इतर महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



