पालघर वडराई हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालवणारा मालक व दलाल महिला… स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या जाळ्यात अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील वडराई येथील एका रिसॉर्ट मध्ये वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या हॉटेल मालका सह एका दलाल महिलेवर कारवाई करून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.ही कारवाई. पालघर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या पथकाने मंगळवारी केली आहे .
सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील वडराई येथील एका रेस्टॉरंट मध्ये हा वेश्या व्यवसाय चालू होता.या हॉटेलचे मालक अजय इंदुलकर आणि महिला दलाल पल्लवी अहिरे महिलांना बोलवून या हॉटेलमध्ये पुरुषांना महिला पुरवण्याचा व्यवसाय करत होते.या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करून चाललेल्या अवैध वेश्या व्यवसाय बाबतची गोपनीय माहिती पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांना प्राप्त झाल्यावर पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या पथकाने या हॉटेलमध्ये डमी ग्राहक पाठवून महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणारे हॉटेलचे मालक अजय इंदुरकर आणि दलाल महिला पल्लवी अहिरे हिला रंगेहात अटक करून दोन पीडित महिलांची सुटका करून हॉटेल मालक व या दलाल महिने विरुद्ध सातपाटी पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक 16 जुलै 2025 रोजी संध्याकाळी गुन्हा दाखल करून त्यांना पालघर कोर्टात हजर केले असता या दोघांना शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर करत आहेत.



