पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध तंबाखू व्यवसायाविरोधात कारवाईला वेग….मोखाडा पोलिसांची यशस्वी कामगिरी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैधरीत्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर मोखाडा पोलीस ठाण्याने गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर मोठी धडक-कडक कारवाई करत सुमारे ४.८४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका इसमाला अटक करण्यात आली आहे.
मोखाडा पोलीसांना नाशिकहून जव्हारकडे जाणाऱ्या एका टाटा इंट्रा पिकअप गाडीतून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे पवारपाडा गावाच्या हद्दीत नाशिक-जव्हार रोडवर नाकाबंदी करत असताना संशयित गाडी थांबवण्यात आली.
चालक मुजिब अजगर मनियार गाडीमध्ये कुरकुरे, गाद्या व पडदे असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी गाडीची कसून झडती घेतली असता विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू आढळून आला. तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या या आरोपीला मोखाडा पोलिसांनी अटक करून जेर बंद केले आहे.



