पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत सापडला अनोळखी बेवारस पुरुष जातीचा मृतदेह

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640
पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील कोरेगाव वैतरणा पुलाखाली शनिवार दिनांक 12 जुलै 2025 रोजी एका अनोळखी पुरुष जातीच्या इसमाचा बेवारस मुतदेह मोखाडा पोलिसांच्या हाती सापडला आहे.
सदर मयत इसमाने तपकिरी रंगाचा फुल बाह्याचा स्वेटर, आणि चॉकलेटी रंगाची थ्री-फोर्थ पॅन्ट परिधान केलेली आहे.त्याच्या उजव्या हातावर इंग्रजी अक्षरांमध्ये MOM DAD व डाव्या हातावर सरिता असे मराठीत गोंदवलेले आहे.या अनोळखी बेवारस मयत इसमा बाबत काही एक माहिती असल्यास स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील – 7776000524,पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत-9922089488,पोलीस उपनिरीक्षक सुनील नलावडे – 9860513566 ,पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे -8308315100 यांच्याशी या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन नागरिकांना मोखाडा पोलीस ठाणे आणि पालघर स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून करण्यात येत आहे .



