पालघर मध्ये भाजप जिल्हा अध्यक्ष शुभेच्छा बॅनर फाडल्या प्रकरणी महिलेविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे भरत राजपूत यांची दुसऱ्यांदा पालघर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी लावलेला शुभेच्छा बॅनर एका अज्ञात महिलेने फाडून टाकला आहे.या अज्ञात महिलेविरुद्ध पालघर भाजपचे उपजिल्हाप्रमुख तेजराज हजारी यांनी
पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या अज्ञात महिलेला त्वरित अटक करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांची दुसऱ्यांदा पालघर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पालघर शहरातील मनोर रोड जवळ असलेल्या भाजप कार्यालयासमोर शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर एका अज्ञात महिलेने शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या आसपास फाडून टाकले आहे. ही महिला एका स्कूटरवरून या ठिकाणी आली होती.
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाआहे.
या अज्ञात महिलेविरुद्ध शनिवार दिनांक 12 जुलै रोजी भाजप पालघर जिल्हाप्रमुख तेजराज हजारे यांनी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या महिलेला त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्याकडून करण्यात आली आहे.



