महाराष्ट्र

सफाळे नवघर घाटीम रस्ता दुरुस्त करण्यात यावा. यासाठी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

टाईम्स नाईन न्यूज नेटवर्क
उपसंपादक विजय घरत.
भ्रमणध्वनी क्रमांक. -7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे पूर्व येथील नवघर घाटीम रस्त्यावरून गेल्या चार वर्षापासून मुंबई वडोदरा एक्सप्रेसच्या कामासाठी जी.आर.आय. एल या कंपनीचे ठेकेदार अवजड वाहनांची या रस्त्यावरून वाहतूक करत असल्यामुळे सध्या स्थितीत या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे खड्डे पडले आहेत

यामुळे स्थानिक वाहतूकदार व नागरिकांना या रस्त्यावरून येजा करताना आपला जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागतो या रस्त्यावर यापूर्वी या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासन गेल्य चार वर्षापासून दुर्लक्ष करत असल्यामुळे या भागातील नागरिकांनी अखेर हे रस्ते गणपती सणाच्या पूर्वी दुरुस्त करून पावसाळ्यानंतर संपूर्ण रस्त्याचे काम न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. याबाबतचे पत्रक गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी सौ. कामिनी रमेश पाटील पालघर पंचायती समिती सदस्य नवघर घाटीम व अनुप पाटील उपजिल्हाप्रमुख पालघर (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ) आणि नवघर घाटीम ग्रामस्थांनी सफाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्याकडे दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button