महाराष्ट्र

पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा..

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

मोईन रफीक तांबोळी अकलूज. याची घरची परिस्थिती बेताची. रफीक तांबोळी यांचा पारंपारीक व्यवसाय. मोईन लहानपणापासून अभ्यासात खूपच हुशार होता. 12 वी झाल्यानंतरच मला डॉक्टर व्हायचंय.अशी इच्छा मनात जागृत झाली. अकलूज मधील ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबूबकरभाई तांबोळी यांनी मोईनला बोलाऊन कागदपत्राचा तपासणी करत त्याची इच्छाशक्ति चे निरीक्षण केले.

अभ्यासातील अचूकता आणी अध्ययनाची गती वाढवण्यासाठी ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी यानी मोइनला लॅपटॉप देण्याचे आश्वासन दिले. संस्थापक अध्यक्ष हाजी अ. कादरभाई तांबोळी यांच्या हस्ते मोइनला लॅपटॉप देण्यात आला.मोइनने12वी नंतर डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असणारी नीट परीक्षाची तैयारी करण्यासाठी लातूरला प्रवेश घेतला. प्रवेश फी आणी हॉस्टेल -मेस यांची फी भरताना मोईनच्या कुटुंबाची ओढाताण होत होती.

पुन्हा मोईनने हाजी अबुबकरभाई तांबोळी यांना प्रामाणिकपणे अडचण सांगितली.मोईनवर विश्वास ठेवत हाजी अबुबकरभाई तांबोळी यानी मोईनची चिकाटी,जिद्द पाहून अभ्यास कारण्यासाठी प्रेरणा दिली व अर्थिक सहकार्य करत पाठीवर शाबासकीची थाप देत मोईनचे मनोबल वाढवले.चालू वर्षी झालेल्या नीट परीक्षेत मोईनला 557 गुण मिळाले.सर्वांचा विश्वास मोईनने सार्थ ठरविला. मोईनची वैद्यकीय क्षेत्रात सेवा करण्याची स्वप्नपूर्ती यावर्षी होणार आहे. खरच गुणवंत विद्यार्थी शोधून समाजातील सामाजिक संस्था- धनिकांनी प्रयत्न केले तर अनेक गुणवंत मोईन सापडतील. गरज आहे फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button