शैक्षणिक

जि.प .प्रा .केंद्रशाळा पोथरेचा शाळापूर्व तयारी मेळावा क्र. 2 जल्लोषात संपन्न

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

आज दि . 22 जून 2024 रोजी जि.प . प्रा . केंद्रशाळा पोथरे येथे शाळापूर्व तयारी मेळावा क्र. 2 घेण्यात आला .अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष साळुंके हे होते . अध्यक्षांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली .

मेळाव्यासाठी बहुसंख्य सन्माननीय पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला . विशेषत : बहुसंख्य माता पालक आवर्जून उपस्थित होत्या . यावेळी मान्यवर पालकांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प, रंगीत टोप्या, फुगे, चॉकलेट देऊन करण्यात आले .

त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे थोडक्यात प्रास्तविक श्रीम. हुंडेकरी मॅडम यांनी केले . यानंतर मांडण्यात आलेल्या टेबल क्र . 1 ते 7 वर बसलेल्या अंगणवाडी सेविका, शाळेतील शिक्षक, वर्गशिक्षक श्री. रोकडे सर , यांनी इ . पहिलीत नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना प्रेमाने थोडेसे बोलते करून त्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला व त्यांना प्राथमिक शिक्षणाच्या प्रवाहात सामिल करून घेतले . सर्व नवागत विद्यार्थ्यांचा उत्साह आज ओसंडून वाहत होता .

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. अंगद देवकते व नवीन पालक तथा पत्रकार श्री. नितीन झिंजाडे यांनी आपल्या मनोगतातून जिल्हा परिषद शाळांची गरज, विद्यार्थ्यांची होत असलेली सर्वांगीण प्रगती आणि शिक्षक वर्गाकडून समाजाची असलेली रास्त अपेक्षा व पालकांचे अपेक्षित सहकार्य यावर आपले विचार व्यक्त केले .

मा.अध्यक्ष श्री . संतोष साळुंके यांनी मुख्याध्यापक श्री. गुरव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच क्षेत्रात शाळेची होत असलेली घोडदौड याबाबत समाधान व्यक्त केले . सन्माननीय पालक श्री. अनिल झिंजाडे, श्री. अय्युबभाई शेख, श्री. गणेश जाधव, श्री. जयसिंग शिंदे, श्री. किरण शिंदे , श्री. दिपक नंदरगे, श्री. बिरु काळे, श्री. दादा रंदवे, श्री. विठ्ठल रंदवे, श्री. रणजित रणवरे ,सौ. रजनी जाधव, सौ. लक्ष्मी रंदवे, सौ. राणी झिंजाडे, सौ. कल्पना जाधव यांनी शाळेच्या पुढील कार्यासाठी विशेष शुभेच्छा देऊन गावात एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही आणि गाव व परिसरातील सर्व दाखलपात्र मुले जिल्हा परिषद शाळेतच दाखल करून जिल्हा परिषद शाळांचे वैभव आणखी वाढविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू असे अभिवचन दिले.

शेवटी सर्वांचे आभार मुख्याध्यापक श्री. गुरव सर यांनी मानले .मान्यवरांच्या हस्ते मिष्टान्न म्हणून गोड लापशी आणि पौष्टिक खिचडीचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले .अशाप्रकारे आजचा पोथरे शाळेचा मेळावा जल्लोषात संपन्न झाला .

आजचे उत्कृष्ट आणि आकर्षक फलकलेखन श्रीम. शिरसकर मॅडम यांनी केले.तर मेळाव्यासाठी विशेष परिश्रम श्रीम.मिर्झा मॅडम,श्रीम,गानबोटे मॅडम ,श्री. रोकडे सर यांनी घेतले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button