छोटे प्लॉट तात्काळ वितरित करा.उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आदेश ,!!!जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या प्रयत्नांना यश!!!
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
करमाळा तालुक्यात रखडलेल्या एमआयडीसीमध्ये पाच पाच गुंठ्याचे 40 छोटे छोटे प्लॉट तात्काळ वितरित करण्याची ई-टेंडरिंग प्रक्रिया सुरू करा असे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी सहा महिन्यापूर्वी एमआयडीसीतील मोठ्या प्लॉटचे तुकडे पाडून पाच पाच गुंठे चे प्लॉट करून ते लघु उद्योजकांना द्यावेत अशी मागणी केली होती यावर उद्योग मंत्री सामंत यांनी पाच पाच गुंठ्याचे प्लॉट रेखांकन करण्याचे आदेश दिले होते करमाळा एमआयडीसी मध्ये पाच ते सहा गुंठे यांचे जवळपास 60 प्लॉट रेखांकन झाले असून नकाशा तयार झाला आहे मात्र हे प्लॉट वितरित करण्यासाठी अद्याप प आदेश निघालेले नव्हते
मुंबई येथे जिल्हाप्रमुख महेश चिवटे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख राहुल कानगुडे व शहरप्रमुख संजय आप्पा शीलवंत यांनी उद्योग मंत्री सामंत यांची भेट घेऊन हे प्लॉट लघु उद्योजकांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निवेदन दिले
यावेळी तात्काळ प्रथमता शासकीय दरानुसार हे प्लॉट वितरित करण्याच्या सूचना सांगली विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुंधरा बिरजे यांना दिले आहेत
याबाबत माहिती देताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की करमाळा एमआयडीसीचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेला यश मिळाले असून
आत्तापर्यंत रस्ते लाइट व पाणी उपलब्ध करण्यासाठी सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले असून एमआयडीसीमध्ये अद्यावत पाणी रस्ते उपलब्ध झाले आहे नवीन पाणीपुरवठा व दिवाबत्तीसाठी पाच कोटी रुपये मंजूर होऊन त्याचे टेंडर झाले आहे
एका महिनाभरात हे प्लॉट वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल आठशे रुपये ते 1000 रुपये चौरस मीटर प्रमाणे या प्लॉटचे अनामत रक्कम राहील असा अंदाज जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केला आहे
गेली तीस वर्षापासून प्रलंबित असलेला एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे अध्यक्ष कुलकर्णी व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल शेठ संचेती यांनी अभिनंदन केले आहे
वसुंधरा बिरजे ;;;
कार्यकारी संचालक एमआयडीसी सांगली!!
उद्योग मंत्री सामंत यांच्या आदेशाने दोन मोठ्या प्लॉटमध्ये छोटे-छोटे 40 ते 50 प्लॉट निर्माण करण्यात आले असून हे प्लॉट वाटप ऑनलाईन करण्यात येणार असून या संदर्भात लवकरच करमाळा येथे कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन चेअरमन महेश चिवटे यांचे उपस्थित इच्छुक उद्योजकांची बैठक घेऊ असे सांगितले