महाराष्ट्र

जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळालाच पाहिजे; रेल्वे प्रशासनाला 21 दिवसांचा अल्टीमेटम, अन्यथा रेल रोको- हजारोंच्या संख्येने रेल्वे प्रशासनाला दिले निवेदन

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख

आज मंगळवारी 21 तारखेला जेऊर येथील स्टेशन मास्तर यांना हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा मिळविण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले यावेळी सर्व पक्षीय तसेच विविध संघटनाकडून रेल्वे प्रवासनाला निवदेन देण्यात आले. हुतात्मा एक्सप्रेसला येत्या 21 दिवसांत थांबा मिळाला नाही तर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान जेऊर परिसरातील नागरिकांनी या मोर्चाला प्रचंड मोठा पाठिंबा दिला विविध संघटनाकडून निवेदने सादर करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या हुतात्मा एक्सप्रेस थांब्यासाठी रेल्वे प्रशासन उदासीन आहे. रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. जेऊरकरांचा अंत पाहत असून आता माघार नाही असा निर्धार काल जेऊर येथे बैठकीत करण्यात आला होता. दरम्यान आज जेऊर ग्रामपंचायत पासून रेल्वे स्टेशन पर्यंत शांततेत मोर्चा काढण्यात आला. जेऊर मधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या मोर्चात सहभागी झाले होते. करमाळा तालुक्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या जेऊर रेल्वे स्टेशन येथे हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस थांबवण्यात यावी याबाबत युवा नेते पृथ्वीराज पाटील डॉक्टर सुभाष सुराणा सुहास सूर्यवंशी महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर महिंद्र पाटील संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके एडवोकेट सविता शिंदे भाजपाचे नरेंद्र ठाकूर श्याम शिंदे तसेच अग्रवाल यांची भाषणे झाली यावेळी जेऊर येथील स्टेशन मास्तर नागेश निगुडकर व जयप्रकाश कुमार यांना निवेदन देण्यात आली

हुतात्मा इंटरसिटी रेल्वे जेऊर येथे थांबविण्यात यावी यासाठी आजी-माजी आमदारा चे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याकडे साकडे

जेऊर येथे हुतात्मा इंटरसिटी रेल्वे एक्सप्रेस थांबविण्यात यावी या मागणीचे निवेदन आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार नारायण आबा पाटील माजी आमदार जयवंतराव जगताप माजी आमदार शामलताई बागल युवा नेते रशमी बागल तसेच प्रहार संघटनेचे संदीप तळेकर यांनी हुतात्मा इंटरसिटी रेल्वे ला जेऊर येथे थांबा मिळावा अशा मागणीचे निवेदन वरिष्ठ रेल्वे प्रबंधकाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button