शुभांगी ताई पाटील यांची शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी निवड

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
शुभांगी ताई पाटील यांची शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.नुकत्याच झालेल्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेना व महाविकास आघाडी तर्फे उमेदवारी केलेल्या व राज्यभरात आपल्या लढवय्या बण्यामुळे चर्चेत राहिलेल्या,शिवसेनेची वाघीण ॲड. शुभांगी ताई पाटील यांच्या कार्याची दखल घेत आज शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्र(धुळे, जळगांव, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर) महिला संपर्कप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. या नियुक्ती बद्दल शिवसेना नेते मा संजय राऊत साहेब ,मा सुभाष देसाई साहेब, मा ज मो अभ्यंकर साहेब ,विधानसभा उपाध्यक्ष नीलम ताई गोरे आदी मान्यवरांनी शुभांगी ताई पाटील यांचे अभिनंदन केले जय महाराष्ट्र ताई साहेब



