श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३२४ चे रोलर पूजन संपन्न

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३-२४ चे रोलर पूजन विधानपरिषद आमदार तथा श्री. शंकर सहकारी चे चेअरमन मा. . रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच कारखान्याच्या प्रस्तावित 5500 मे टन प्रतिदिवस गाळप क्षमतेच्या विस्तारीकरण कामाच्या पूर्वतयारीचा आढावा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतला. सन 2023-24 गळीत हंगामा मध्ये कारखान्याने 5 लाख मे टन गाळपाचे उद्धिष्ट ठेवले असून सभासद,ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस दर देण्यास कारखाना व्यवस्थापन कटिबद्ध असून सभासद तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गळितासाठी कारखान्यास पाठविणेचे आवाहन मोहिते पाटील यांनी केले.

या प्रसंगी अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, श्री शंकर सहकारी चे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी, संचालक बाबाराजे देशमुख, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील दत्तात्रय रणवरे, संजय कोरटकर, चंद्रकांत शिंदे, रामदास कर्णे, सुरेश पाटील, धोंडीराम नाळे, सुधाकर पोळ, अर्जुन धाईंजे, शिवाजी गोरे, दत्तात्रय वाघमोडे, नंदन दाते, सुनील माने, दत्तात्रय चव्हाण, शिवाजी लवटे, सौ. अलका पाटील, शिवामृतचे संचालक अरविंद भोसले, नितीन इंगोले देशमुख, उपसरपंच विक्रम पाटील, विलास फडतरे, अनंतलाल दोशी, देविदास ढोपे, लालखान पठाण, उपसरपंच उदय धाईंजे, गोरक्षनाथ पालवे, संतोष शिंदे, दत्ता भोसले, बबन भुजबळ, लक्ष्मण मोहिते तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, सर्व खाते प्रमुख, इतर पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.






