महाराष्ट्र

शाळा कॉलेज समोर फिरणाऱ्या रोड रोमिओ यांचा बंदोबस्त करा- साईराज अडगळे.महाराष्ट्र विकास युवा सेनेचे अकलूज पोलीस स्टेशनला निवेदन

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अकलूज परिसरामध्ये रोड रोमिओंनी हैदोस घातलेला आहे.त्या रोड रोमिओनचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी महाराष्ट्र विकास युवा सेनेच्या वतीने पक्ष प्रमुख किरण साठे साहेब तसेच प्रदेश सचिव अनिल दादा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले. यावेळी युवा सेना जिल्हा संघटक साईराज आडगळे, युवा सेना तालुकाध्यक्ष आदित्य काकडे, युवा सेना अकलूज शहराध्यक्ष अजित माने उपस्थित होते.

अकलूज मध्ये शाळा कॉलेजेस असल्यामुळे गावातील इतर गावातील मुली या ठिकाणी शिकण्यासाठी येत असतात. त्या मुली शाळा कॉलेजला येत असताना
अकलूज मध्ये शाळा, कॉलेजसमोर रोड रोमिओं विद्यार्थिनींचा पाठलाग करून छेड काढतात. परंतु मुली तक्रार देण्यास घाबरतात.मुलींच्या छेडछाडीच्या वाढत्या घटनांमुळे मुलींच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरांमधील शाळा-महाविद्यालयांच्या आवारात शाळा-महाविद्यालयसुरु होताना आणि सुटल्यानंतर पोलिसांनी गस्त घालणे गरजेचे आहे. त्यामुळे आमच्या निवेदनाची दखल घेऊन लवकर रोड रोमिओनचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button