पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे उत्तर प्रदेश दिवस उत्साहात साजरा
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक – 7030516640.
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पूर्व लिंक रोड येथे उत्तर भारतीय विकास मंच आयोजित उत्तर प्रदेश स्थापना दिवस महोत्सव बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी या महोत्सवाला मुख्य अतिथी म्हणून पालघर लोकसभा खासदार राजेंद्र गावित उपस्थित होते.या कार्यक्रमा प्रसंगी खासदार राजेंद्र गावित यांनी वसई विरार क्षेत्रात उत्तर भारतीय भवन निर्माण करून देणार असल्याचे आश्वासन उत्तर भारतीय नागरिकांना दिले.
मात्र उभारण्यात येणाऱ्या वास्तूसाठी लागणाऱ्या जागेची तरतूद आयोजक करून देणार असल्याचे सांगण्यात आले सदर कार्यक्रमात माजी आमदार विलास तरे, माजी महापौर रुपेश जाधव, डॉ. दुबे, तसेच उत्तर भारतीय समाजातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.