थकित उसाच्या बिलासाठी शेतकरी करणार उद्या प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन
करमाळा प्रतिनिधी
श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊसाची बिले मिळावीच यासाठी ऊस उत्पादक उद्या 26 जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करणार असल्याची माहिती ऊस उत्पादक शेतकरी एडवोकेट राहुल सावंत यांनी बोलताना दिलीयाबाबत अधिक माहिती देताना सावंत पुढे बोलताना म्हणाले की करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची थकीत उसाची बिले गेली कित्येक वर्षापासून थकीत असून आम्ही यासाठी वेळोवेळी वेगवेगळी
आंदोलने रास्ता रोको विविध प्रकारचे आंदोलने केली मात्र सदर कारखान्याच्या चेअरमन सहित संचालक मंडळाला काही करेना पाझर फुटेना अखेर आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उद्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आम्ही करमाळा तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी सामुदायिक आत्मदहन करणार असल्याची माहिती शेवटी श्री सावंत यांनी बोलताना दिली थकीत उसाची बिले मिळावीत यासाठी गेली कित्येक महिन्यापासून प्राध्यापक रामदास झोळ दशरथ कांबळे सहित असंख ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करीत आहेत