फरहत तनवीर बागवान (मोहोळकर) हिने मिळवले 12 वी च्या परीक्षेत उज्वल यश…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज येथील मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक रफिकभाई मोहोळकर यांची नात कु फरहत तनवीर बागवान (मोहोळकर) हिने 2025 च्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या एच एस सी बोर्डाच्या परीक्षे मध्ये 62 टक्के गुण मिळवत घवघवित असे यश संपादन केले…
कु फरहत तनवीर बागवान (मोहोळकर) हिने मिळवलेले यश हे वाखाणण्याजोगे आहे,त्याची कामाच्या प्रती असणारी खरी तत्परता दिसून आली असून हि त्याच्या कामाची पावती असल्याचे तिने सांगितले,भविष्यात उच्च शिक्षण घेणार असल्याचे हि तिने टाइम्स 9 न्यूज चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्याशी बोलताना सांगितले…

पुढे बोलताना ती असे हि म्हणाली की,माझ्या या यशा मध्ये आज्जी,आजोबा,आई,वडील,चुलते आणि भाऊ यांचा हि मोलाचा वाटा असुन त्यांच्या आशीर्वादानेच आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आज मी पार केल्याचे तिने सांगितले…
पुढील शिक्षणासाठी घरातील सर्व मंडळीशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे हि तिने शेवटी सांगितले, तिने मिळवलेल्या या यशाने मात्र तनवीर बागवान (मोहोळकर) यांचे वर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे…
कु फरहत तनवीर बागवान (मोहोळकर) हि लातूर चे रि शाखा निबंधक के पी बागवान यांची हि नात असून लातूर येथील कै प्रयागबाई पाटील ज्युनिअर कॉलेज ची ती विद्यार्थिनी आहे…



