महाराष्ट्र
पालघर जिल्ह्यातील सफाळे वेढी गावात राहणारे ज्येष्ठ नागरिक मोरेश्वर लोहार यांचा तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून जागीच मृत्यू

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून (65) वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह एका शेळीचा जागीच मृत्यू झाला आहे .ही घटना बुधवारी सकाळी पालघर जिल्ह्यातील सफाळे चटाळे हद्दीत घडली आहे.
पालघर जिल्ह्यातील वेढी गावात राहणारे (65 )वर्षीय ज्येष्ठ नागरिक मोरेश्वर लोहार बुधवार दिनांक 07 मे 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता चटाळे गावाशेजारी आपल्या शेळ्या चारणण्यासाठी गेले होते.यावेळी त्यांना त्यांची एक बकरी झाडा शेजारी पडलेल्या अवस्थेत दिसल्यावर ते त्या बकरीला काढण्यासाठी गेल्यावर तिथे पडलेल्या विद्युत तारेवर त्यांचा पाय पडल्यावर शॉक लागून मोरेश्वर लोहार यांचा जागीच मृत्यू झाला आहे.



