महाराष्ट्र

महाराष्ट्रासाठी हा आठवडा महत्वाचा ठरू शकेल…?नेमकं घडतंय काय…? या कडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष…

आमीर मोहोळकर 

टाइम्स 9 न्यूज,अकलूज 

9890299499

अगदी दोनच दिवसांपूर्वी प्रख्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या पॉडकास्ट चॅनल द्वारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाकात प्रसिध्द केली अन् त्या मुलाखती मध्ये महेश मांजरेकर यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी उबाठा सेनेला टाळी देण्याचा प्रयत्न केला,या मुळे झाले असे की, अवघ्या महाराष्ट्राचे “राजकारण” मात्र ढवळून निघाले…

आपल्या प्रभावी अशा ठाकरी शैलीत बोलतांना राज ठाकरे असे म्हणाले की,महाराष्ट्रा समोर आमचे भांडण,वाद,कलह हे अगदीच छोटे आहेत,महाराष्ट्र मोठा आहे आणि आमच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राचे भले होत असेल तर आम्हाला एकत्र येण्यास काहीच अडचण नाहीं असे राज ठाकरे बोलून गेले…

याचा परिणाम सबंध महाराष्ट्राच्या आज चाललेल्या राजकारणावर झाला नसेल का…? असा प्रश्न मात्र नक्कीच पडतो,परंतु या पडलेल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी देश भरातील राजकीय “प्रकांड पंडितांनी” ज्या ज्या प्रकारे आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत ते पाहून मात्र राजकारणाची थोडीशी का होईना कीव करावी असे वाटते…असो…

राज ठाकरे यांच्या “त्या” वक्तव्यानंतर सकाळचा भोंगा म्हणून प्रसिध्द असलेले थोर राजकारणी तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत तर मीडिया समोरून जाता जात नाहीत,सकाळ दुपार संध्याकाळ संजय राऊत हे ठाकरे बंधू का एकत्र येऊ नये याची खबरदारी सुध्दा घेताना दिसत आहेत…

अशातच चाणाक्ष आणि हुशार बुद्धीच्या राज ठाकरे यांनी समस्त मन सैनिकांना 29 एप्रिल पर्यंत “टाईम प्लीज” म्हणत शांत राहण्याचे आदेश देत परदेस दौऱ्यावर निघून गेले आहेत,या मुळे खरी गोची झाली आहे ती मनसे च्या प्रवकत्यांची.देशपांडे आणि महाजन ह्या मन प्रवकत्यांची तर भंबेरी उडाली असून मीडिया शी काय बोलावे आणि कसे बोलावे याचे मात्र त्यांना निश्चितच कोडे पडले असावे असे सध्या तरी वाटत आहे…

इकडे संजय राऊत मात्र उबाठा गटाचा किल्ला एक हाती लढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत,संजय राऊत यांना तर पत्रकारांनी प्रश्नांचा एवढा प्रचंड असा मारा करून देखील ते धीरोदात्त प्रमाणे सर्वांना अंगावर घेत आहेत आणि सबंध महाराष्ट्रातील जनता मात्र 29 एप्रिल या तारखेची आतुरतेने वाट पाहत आहे…

जर समजून चला या आठवड्यात राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र आले तर याचा नेमका फायदा कोणाला होणार आहे हे आत्ताच निश्चित पणे सांगता येणार नाही याचे कारण हि तसेच आहे की या दोन्हीं बंधूंना महाराष्ट्राने गत निवडणूकीत नाकारले असुन उबाठा गट आणि मनसे काय साध्य करू पाहतेय हे त्यांचे त्यांनाच ठाऊक…

आपण असे समजू की,येणाऱ्या आठवड्यात राज आणि उद्धव हे दोन्हीं साहेब जर एकत्र आले तर असे होऊ नये की,मुसलमान व्हायला आणि रोजाचा महिना यायला गाठ पडू नये म्हणजे झालं.कारण केंद्रात आणि राज्यात भाजप सारख्या बलाढ्य अशा पैलवानाशी यांची गाठ असणार आहे.भाजपा सोबत एकनाथ शिंदे तर असणारच आहेत…

आता राहिली गोष्ट अजित दादा पवार यांची ते आणि त्यांचे काकाश्री शरद पवार साहेब तर ठाकरे बंधू यांच्या किती तरी अगोदर एकत्र आले आहेत असे संजय राऊत यांचेच स्टेटमेंट आहे आणि या वृत्ताला दस्तुर खुद सुप्रिया सुळे यांनी सुध्दा हिरवा कंदील दिला असल्याचे सोशल मीडिया तून बोलले जात आहे…

महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून येणाऱ्या आठवड्या कडे सगळ्यांच्या नजरा लागून असल्या पाहिजेत असे माझे तर स्पष्ठ मत आहे,या विषयी आपले मत काय आहे हे टाइम्स 9 न्यूज ला जरूर कळवा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button