महाराष्ट्र

हजरत पीर पठाण बाबा यांच्या उरूस निमित्त माळीनगर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या हस्ते मानाची चादर अर्पण…

प्रतिनिधी.. रियाज मुलाणी
मो.9921500780

माळीनगर चे ग्रामदैवत सर्व बहुजन बांधवांचे श्रद्धास्थान असणारे हजरत पीर पठाणशाहा रह. यांचा उरूस हा जर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.सालाबाद प्रमाणे माळीनगर साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या हस्ते हजरत पीर पठाणशाहा बाबा यांना मानाची चादर अर्पण करण्यात आली, यावेळी फातिहा व सलाम चे पठण मौलाना जुबेर सय्यद यांनी केले.चादर चढवण्याचा मान हा पहिल्यापासून कारखानाच्या संचालक मंडळाला दिला जातो. या कार्यक्रमाचे पाहुणे माळीनगर गावच्या सरपंच अनुपमा अनिल एकतपुरे यांनी फुलाची चादर अर्पण करून दर्शन घेतले व सर्व समाज बांधवांना उर्सानिमित्त शुभेच्छा दिल्या

यावेळी अनिल एकतपुरे,ग्रामपंचायत सदस्य प्रदीपकुमार सुभाषराव निंबाळकर,लक्ष्मण डोईफोडे, मच्छिंद्र हजारे,अभिजीत वजाळे,चांदणी वजाळे,आसमा मुलाणी, गेजगे मॅडम, अनिल सकट,उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमासाठी व्यापारी संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक शिरीष फडे,ज्येष्ठ समाजसेवक अनिल लोंढे,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रिंकू राऊत, माळीनगर चे माजी सरपंच अभिमान जगताप,माजी उपसरपंच बाळासाहेब वाजळे, माजी उपसरपंच संग्राम भोसले, डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष भैय्यासाहेब कांबळे, विशाल वजाळे, पत्रकार हुसेन मुलाणी, पत्रकार शौकत तांबोळी, निलेश एकतपुरे, सोमनाथ हुलगे, अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस तांबोळी साहेब,आदमभाई तांबोळी, डॉ. असलम शेख, डॉ. फारुख शेख,तसेच सर्व क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी पीर पठाण बाबा उरूस कमिटीच्या वतीने सर्व मान्यवरांचा हार व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्व पंचक्रोशीतून दर्शनासाठी येणाऱ्या भावी भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती व सर्व भावि भक्तांनी भोजनाचा आस्वाद घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पीर पठाण बाबा उरूस कमिटी व जाफरभाई सय्यद यांनी अथक परिश्रम घेतले .
या कार्यक्रमाचे समालोचन लयाकभाई सय्यद यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button