महाराष्ट्र

सफाळे टेंभीखोडावे गावातील विज चोरीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या नव्या योजनेला गावकऱ्यांचा विरोध.. आधी गावातील समस्या सोडवा मग नवीन योजना राबवा

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत

सफाळे भागातील रामबाग सेक्शन विभागातील टेंभीखोडावे गावात विज चोरी होऊ नये म्हणून महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या गावातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर गावातील एकाच पोलवर लावून विज चोरीला आळा घालण्यासाठी नवीन योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला असून आधी गावातील अर्धवट सडलेले जुने लोखंडी विद्युत पोल काढून त्या जागी नवीन पोल बसवावे तसेच खोडावे गावातील गावकऱ्यांनी ट्रांसफार्मरची केलेली मागणी पूर्ण करून नंतर या गावातील सर्व मीटर एका पोलवर बसवावे अशी मागणी केली आहे.

कारण हे अर्धवट सडलेले जुने लोखंडी पोल जर पावसाळ्यात तुटून पडले तर सर्व गावकऱ्यांना अंधारात राहावे लागेल तसेच गावातील विद्युत पोल वरील तारा खाली पडून सहा महिन्या आधी एका बैलाचा मृत्यू झाला असताना देखील आतापर्यंत या तारांची दुरुस्ती करण्यात आली नाही. तसेच या गावात वीज चोरी होत नसल्याचेही गावकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले आहे.म्हणून महाराष्ट्र विद्युत मंडळ सफाळे रामबाग सेक्शन विभागातील अधिकाऱ्यांनी या गावातील जीवाला धोका असलेली कामे आधी पूर्ण करावी अशी मागणी करून या नवीन योजनेला विरोध दर्शवून हे काम गावकऱ्यांनी बंद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button