महाराष्ट्र
बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रास तालुकास्तरीय प्रथम क्रमांक

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, 8378076123
- पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२२-२३ साठीचा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राथमिक आरोग्य केंद्र पुरस्कार बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रास जाहीर झाला आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांचे उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक ताटे व डॉ. ज्ञानेश्वर बाहेगव्हाणकर यांनी सदर पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार वितरण समारंभ पुणे जिल्हा परिषदेमध्ये संपन्न झाला.
बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद व अन्य मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळालेबद्दल अंकिता पाटील ठाकरे यांनी बावडा आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स, कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन केले आहे.



