महाराष्ट्र

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व डॅशिंग क्रिकेट क्लब आयोजित महिलांच्या टी 20 स्पर्धेत भारत क्रिकेट क्लब विजयी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व डॅशिंग क्रिकेट क्लब आयोजित डॅशिंग सुपर वुमन कप टी ट्वेंटी स्पर्धेमध्ये मुंबई येथील भारत क्रिकेट क्लब ने पीडीटीएस संघाचा दारुण पराभव करत अंतिम विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अंतिम सामना आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये 12 संघानी सहभाग नोंदवला होता ही स्पर्धा चार दिवस साखळी पद्धतीने खेळवण्यात आली. अंतिम सामन्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दीपक पाटील, माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर , सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सीए सचिन कोरे, प्राचार्य किरण सावे, भूषण पाटील , विकास पाटील आणि मान्यवर पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये मलिकावीर म्हणून शर्वी सावे हिला गौरविण्यात आले. तर सर्वोत्तम फलंदाज सिमरन शेख ठरली, कशीष निर्मल सर्वोकृष्ट गोलंदाजाचा मान पटकावला तर निर्मिती राणे हिला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या किताबाने गौरविण्यात आले.

अशा स्पर्धा आयोजित करण्याचा उद्देश असतो की यामधून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत जशा राज्यस्तरावरील क्रिकेटच्या स्पर्धा होतात तशाच पद्धतीने ही स्पर्धा भरवण्याची परवानगी सुद्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनने डॅशिंग क्रिकेट क्लबला दिली होती पालघर जिल्ह्यात क्रिकेटची आठ ते दहा मैदानी तयार झाली आहेत मुंबईहून आलेल्या खेळाडूंना वाटेल की एवढ्या लांब यायचं कसं तर वर्षानुवर्ष या भागातून आमची मुलं आणि मुली सकाळी चार वाजता उठून मुंबईला येऊन क्रिकेट खेळायची क्रिकेटसाठी संघर्ष करावा लागतो व मेहनत ही करावी लागते असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दीपक पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले.

क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे प्रत्येक खेळाडूचे यामध्ये योगदान हे महत्त्वाचे असते खेळात शिस्त महत्त्वाची असते मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये शिस्त व वृत्तीला महत्त्व दिले जाते. मुलींसाठी वर्षभरात पंधरा ते वीस स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. वर्षभर तुमच्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन विविध स्पर्धा आयोजित करत असते, त्यामुळे तुम्ही सांगू शकत नाही की आम्हाला संधी मिळाली नाही. तुम्हाला व्यासपीठ उपलब्ध आहे तुम्ही खेळत राहा तुमचा खेळ बोलत राहील असेही यावेळी दीपक पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button