महाराष्ट्र

एकता बहुउद्देशीय संस्थेचे कार्य कौतुकास्पद शिवतेजसिंह मोहिते पाटील

उपसंपादक हुसेन मुलाणी टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क मोबाईल 97 30 867 448

एकता बहुउद्देशीय संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जावेद( बाबा) तांबोळी यांनी अनेक विधायकव समाजोपयोगी उपक्रम राबवून गोरगरिबांना मदत करण्याचे कार्य केले ते कौतुकास पात्र आहे असे प्रतिपादन अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच , शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त एकता बहुउद्देशीय संस्थांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले

याप्रसंगी अकलुज ग्रामपंचायत चे माजी सरपंच -किशोरसिंह माने पाटील, जिल्हा परिषद सदस्य- अरुण तोडकर , माजी सदस्य सुहास गाडे, ग्रामपंचायत माजी सदस्य -विशाल फुले ,ताहेरा फाउंडेशनचे ,अबूबकर तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होतें

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील (काका साहेब) व कैला कै.. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील (अक्कासाहेब )यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एकता बहुउद्देशीय संस्थेचे खजिनदार जब्बार तांबोळी रशिद मुलाणी, नियाज शेख ,जब्बार मुजावर, हसन माढेकर ,सद्दाम जमादार, रमजान सागवान , अस्लम जी, तांबोळी, युन्नु‌स जमादार , आतिक जमादार , हमीद मुलाणी, अजहर जमादार फारुख शेख, आकाश नवगिरे, बबन तांबोळी (सर ) मन्टी तांबोळी रफिक मेदारी, आदि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button