महाराष्ट्र

केम येथील कुंकू कारखानदाराचे घर आणि ऑफिस फोडून रोख रकमेसह नऊ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास…

– तालुक्यातील केम येथील कुंकू कारखानदाराचे घर आणि ऑफिस फोडून सोन्याचे दागिने आणि रोख साडेचार लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. हा प्रकार दि. ८ एप्रिल रोजी पहाटे उघडकीस आला आहे.

याबाबत प्रभाकर मारुती शिंदे (वय 61, रा. केम) यांनी दि. 08/042024 रोजी करमाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 07/04/2024 रोजी रात्री 10/00 च्या सुमारास घरातील सर्व लोक जेवणखाण करून झोपी गेले होते. रात्रौ 02/15 वा. चे. सुमारास लघवी लागल्याने ते हॉलच्या बाहेर आले असता त्यांना हॉलच्या बाजुला असलेल्या बेडरूमचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी आत जावुन पाहीले असता बेडरूम मध्ये लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडलेला व त्यातील सामान खाली फरशीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच बेडरूम शेजारी असलेले कुंकु कारखान्याचे ऑफिसच्या दरवाज्याचे लॉक ही तोडलेले दिसले. यानंतर त्यांनी घरातील लोकांना झोपेतुन उठवले आणि कुंकू कारखान्यावर मुक्कामी गेलेले त्यांचे भाऊ गोपिनाथ यांना फोन करून घरी बोलावुन घेतले. त्यावेळी त्यांना कपाटातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम मिळुन आली नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने कुंकु कारखान्याच्या ऑफिसचे लॉक तोडुन तसेच बेडरूम मधील लोखंडी कपाट कशाचे तरी साहाय्याने उघडुन त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची खात्री झाली.

सदरच्या घरफोडीत अंदाजे दोन लाख रू. किंमतीच्या 4 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, दोन लाख रू. किंमतीचे 3.8 तोळ्याचे सोन्याचे गंठण, एक लाख दहा हजार रु. किंमतीचे 2 तोळ्याचे सोन्याचे मिनि गंठण आणि साडेचार लाख रूपये रोख रक्कम असा एकूण नऊ लाख 80 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात व्यक्तीने चोरी केला आहे.

याबाबत करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पी. बी. टिळेकर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button