शहर

सफाळयात रिक्षाचालकाची खुलेआम दादागिरी…73 वर्षाच्या जेष्ठ नागरिकाला रिक्षाची धडक.. सफाळे पोलिसांनी केली राहुल भोईर यांच्यावर कारवाई

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640

पालघर तालुक्यातील सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील तीन आसनी रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे नागरिकांना दररोज आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवत रिक्षाचालक बेकायदेशीरीत्या सात ते आठ प्रवासी कोंबून धोकादायक परिस्थितीत रिक्षा चालवत आहेत. याचेच उदाहरण म्हणजे सोमवार 8 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अतिरिक्त आठ प्रवासी भरलेल्या एका रिक्षाचालकाने 73 वर्षाच्या जेष्ठ नागरीकाला धडक देऊन उलट त्यांच्या अंगावर धाऊन शिवीगाळ करुन मारण्याची दमदाटी केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे . या घटनेनंतर सफाळे पोलिसांनी रिक्षा चालक राहुल भोईर यांच्या विरुद्ध कारवाई केली आहे.

सोमवारी आठवडे बाजार तसेच गुढीपाडव्यानिमित्त सफाळे बाजारात खरेदीदारांची मोठी रेलचेल होती. यामुळे सफाळे स्थानकाच्या पश्चिमेकडील अनधिकृत रिक्षास्टँडमधील रिक्षाचालकांची सात ते आठ प्रवाशी गोळ्या करुन बेकायदेशीररित्या भाडे मारण्यास जणू स्पर्धाच होती. दुपारी साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास नरेश पाटील राहणार (कपासे) वय वर्ष 73 हे जेष्ठ नागरिक घरी जाण्यासाठी एसटी बस पकडण्यासाठी डेपोत जात होते. यादरम्यान आठ प्रवासी कोंबून रिक्षा चालक (क्रमांक MH 48 BF 8472) राहुल नंदकिशोर भोईर (वय २८ वर्षे) राहणार मांडे याने नरेश पाटील यांच्या उजव्या हाताला रिक्षाची जोरदार धडक दिली.
अचानक जोरात धडक बसल्याने नरेश पाटील यांनी रिक्षा नीट चालव असे सांगितले. यावर राहुल भोईर याने 73 वर्षाच्या जेष्ठ नागरिकाला भर रस्त्यात शिवीगाळ करुन अंगावर धावून “म्हाताऱ्या तुला खाली पाडून मारीन” अशी दमदाटी केली. यावेळी पाटील यांनी तुझी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करतो असे सांगताच “जे करायचे ते कर, पोलिस माझं काही वाकडू करू शकत नाहीत” असे भर रस्त्यात छातीठोक बोलू लागला. सदर घडलेल्या प्रकारातून पाटील यांनी स्वतःला सावरत सफाळे पोलिस स्टेशन गाठून मुजोर रिक्षाचालकाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार सफाळे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी रिक्षा चालकाविरोध कारवाई करून वाहतूक शाखेच्या पोलिसांना देखील त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button