सोलापूर शहर बागवान जमियत सिटी ट्रस्ट “यंग ब्रिगेड” च्या “अध्यक्ष” पदी मुश्ताक (RM) तर “सेक्रेटरी” पदी डॉ अब्दुस्सलाम बागवान…

🎯 मा लवाद कमिटी च्या पुर्व परवानगीने आणि सल्लागार समिती च्या मंडळाने जाहीर केली “यंग ब्रिगेड” कमिटी…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
सोलापूर शहर बागवान जमियत (सिटी ट्रस्ट) यांच्या मार्फत एक नवीन ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला तो म्हणजे हा की आणखी एक नवीन दिशा दर्शक काम म्हणजे,सोलापूर शहर बागबान जमीयत सिटी ट्रस्ट ची “यंग ब्रिगेड” म्हणुन नव्या युवकांना संधी देण्यात आली आणि या मध्ये सुशिक्षीत,व्यावसायिक व नोकरदार व इतर बहुसंख्य युवकांनी प्रतिसाद देत सोलापूर शहर बागवान जमियत च्या कामा मध्ये आपले ही योगदान देणार व समाजाच्या हितासाठी काम करणार असे तमाम नवीन युवकांचे मत होते…
या नव्या निर्णयामुळे येत्या काळात नवीन ऊर्जा तरुणांना मिळणार असुन आपल्या समाजाच्या आर्थिक व दुर्बल बाबी हे युवक आपल्या परीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने या मध्ये आपले योगदान देणार आहेत…
येणाऱ्या काळात समाजाचे काम हे अन्य सामाजिक संघटना व जमातींना दिशा दर्शक ठरेल असे या मध्ये कामे होतील व नव्या पिढीच्या नवीन मसुद्याने यातील कामे पार पडतील…

त्या निमित्त आज सदरील पदाधिकारी लोकांची मा “लवाद कमिटी” यांच्या पूर्व परवानगीने व सल्लागार समितीच्या निवड प्रक्रियेतून युवकांची विविध पदावर निवड करण्यात आली ती खालीलप्रमाणे…
अध्यक्ष :- मुश्ताक RM बागवान
उपाध्यक्ष :- मुब्बशिर तुळजापूरे व बबलू बागवान
कार्याध्यक्ष :- इंजि सर्फराज शेख (बागवान)
सेक्रेटरी :- डॉ अब्दुस्सलाम बागवान
जॉ सेक्रेटरी :- मतीन मैंदर्गिकर व बाबा सिंदगिकर
खजिनदार :- CA उमर रामपुरे
कायदेतज्ञ : ॲड वसीम बागवान
अर्थतज्ञ :- CA नवाज बागवान
मिडिया प्रमुख :- मुज्जफर बागवान व वसीमराजा बागवान
सोलापूर शहर बागवान जमात सिटी ट्रस्ट च्या युवक संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना आमीर मोहोळकर,अकलूज आणि टाइम्स 9 न्यूज नेटवर्क यांच्या वतीने अनेकानेक शुभेच्छा….



