पालघर जिल्हा पोलिसांकडून राबवल्या जाणाऱ्या सायबर गुन्हे मुक्त गाव अभियाना अंतर्गत तांदूळवाडी येथे दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सपोनि दत्ता. के. शेळके आणि ॲडव्होकेट कांचन भोईर

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील तांदुळवाडी नाईक फाउंडेशन येथील दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नवीन कायदेविषयक आणि सायबर गुन्हे या विषयी बुधवारी सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता. के. शेळके आणि ॲडव्होकेट कांचन भोईर यांनी सविस्तर माहिती दिली.यावेळी एनएसएस (NSS) कॅम्प दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संपूर्ण पालघर जिल्ह्यात पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियान राबवले जात आहे.
या अभियाना अंतर्गत सायबर गुन्हे मुक्त गाव मोहीम राबवण्यात येत आहे.

या मोहिमे मोहिमे अंतर्गत बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील तांदुळवाडी नाईक फाउंडेशन येथील NSS कॅम्प दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायबर क्राईम, आर्थिक गुन्ह्यांचे प्रकार, अनधिकृत खोट्या कंपन्यांकडून देण्यात येणारी जाहिरात फसवणूक, लैंगिक फसवणूक, केवायसी फसवणूक, डिजिटल अरेस्ट, क्रेडिट कार्ड फसवणूक, याविषयी माहिती देऊन त्यावरील उपाय व पूर्व खबरदारी याबाबत सखोल मार्गदर्शन करून फ्रॉड झाल्यावर 1930 या क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या तसेच पालघर पोलीस दलाच्या वेबसाईट बद्दल माहिती देऊन पालघर पोलीस दलाचे फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्याचे आवाहन सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता . के. शेळके यांनी केले.

तसेच यावेळी उपस्थित ॲडव्होकेट सौ : कांचन भोईर (पाटील ) पोलीस उपनिरीक्षक सावंत, पोलीस हवालदार कैलास शेळके, महिला पोलीस शिपाई कोकरे यांनी नवीन कायदे, भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय सुरक्षा अधिनियम 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023, याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.



