महाराष्ट्र

सयाजीराजे मित्र मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

शेवटची माहिती हाथी आली तेंव्हा जवळ जवळ 107 युवकांचें झाले होते रक्तदान…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

सहकार महर्षी कै शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या सयाजीराजे मित्र मंडळाच्या वतीने भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन विजय विद्यार्थी वस्ती गृह येथे करण्यात आले होते…

या रक्तदान शिबिराचे उदघाट्न युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले,या वेळी माळशिरस तालुक्याचे जाणते राजे जयसिंह तथा (बाळदादा) मोहिते पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,माजी जि प सदस्या कु स्वरूपाराणी मोहिते पाटील,अकलूज चे माजी सरपंच शिवतेजसिंह (बाबा) मोहिते पाटील यांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली…

अंधारे साहेब,आप्पासाहेब मगर,रामचंद्र गायकवाड,बाळासाहेब सनस,रणजित रणवरे,विशाल मोरे,उत्कर्ष शेटे,संदीप खंडागळे,विशाल फुले,राहुल फुले हे हि आवर्जून उपस्थित होते…

सयाजीराजे मित्र मंडळाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवित यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान केले,संध्याकाळी 4 वाजे च्या सुमारास जवळ जवळ 107 युवकांनी रक्तदान केल्याची प्राथमिक माहिती टाइम्स 9 न्यूज ला मिळाली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button