महाराष्ट्र

मंद्रूपचा आफताब फारुख बागवान मुंबई शहराचा पोलिस…

🎯 बागवान समाजातील फळ विक्रेत्याचा मुलगा अखेर पोलिस झालाच…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

घरचं अठरा विश्व दारिद्र्य,त्यात मुस्लिम समाजातील ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असणारा,पुणे येथील संस्कार दिप अकॅडमीचा विद्यार्थी आणि सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूपचा आफताब फारुख बागवान हा एका फळ विक्रेत्याचा मुलगा अखेर पोलिस झाला तो हि मुंबईचा…

फारुख बागवान हे मंद्रूपचे फळ विक्रेते म्हणून प्रसिध्द तर आहेतच परंतु मूळचे ते अकलूजचे,अकलूज येथील एके काळचे प्रसिद्ध फळ व्यापारी असलेले खाजू मर्चंट यांचा थोरला चिरंजीव म्हणजे फारुख आणि मुंबई पोलिस झालेला आफताब हा त्यांचा नातू…

पोटाची खळगी भरण्यासाठी दक्षिण सोलापूर येथील मंद्रूपचा रहिवाशी झालेला फारुख बागवान हा माझा लहानपणीचा मित्र,काही वर्षांपूर्वी मंद्रूप येथे स्थायिक झाल्या नंतर अनेक अडचणींना तोंड देत आज इथवर पोहचलाच…

फारुख बागवान याचा पत्नी,दोन मुले एक मुलगी असा परिवार,मुलगी आपल्याच नात्यात अकलूज येथे दिलेली,त्याचा हि सुखाचा संसार अन् थोरला मुलगा आफताब हा अडीच हजार विद्यार्थ्यांमध्ये 91 च्या रेटिंग ने मुंबई पोलिस झाल्याने साऱ्या कुटुंबाचा आनंद गगनात न मावणारा…

काल अचानक माझा मित्र फारुख बागवान याचा फोन आला आणि बोलता बोलता थोडा भावना विवश झाला आणि म्हणाला “मेहनत मेरे बच्चे की रंग लायी” मुलगा पोलिस झाल्याची इथंभुत माहिती तो मला देत होता…

आफताब मुंबई पोलिस झाल्याची वार्ता मंद्रूप येथे पोहचताच त्याच्या मित्रांनी एकच जल्लोष करत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिलेला क्षण तर आयुष्यात न विसरणारा असाच होता,या वेळी आफताब ची आई देखील भारावून गेलेली पहायला मिळाली,नकळत पणे त्या मातेच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या अनेक जणांनी पाहिल्या,आफताब चा धाकटा भाऊ बेभान होऊन अक्षरशः नाचतच होता…

या वेळी बोलताना मुंबई पोलिस आफताब बागवान म्हणाला की,जिद्द आणि चिकाटी अंगी होती आणि आजोबांचा आशीर्वाद सदैव माझ्या सोबत असल्याने आजचा रिझल्ट माझ्या मना सारखा लागला अन् मी पोलिस झालो,मी पोलिस व्हावे असे आजोबांचे स्वप्न होते आणि ते आज पूर्ण झाले…

मुंबई पोलिस आफताब बागवान यास टाइम्स 9 न्यूज आणि आमीर मोहोळकर यांच्या परिवाराच्या वतीने त्याच्या भावी कारकिर्दी साठी अनेकानेक शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button