आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बदलांच्या आव्हानांसाठी शिक्षकांना प्रशिक्षण…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या बदलांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांना सक्षम करणे आवश्यक आहे.
यासाठी अध्ययन अध्यापन व मूल्यमापन यांचा परस्पर संबंध व यानुसार होणारे मुलांचे अध्ययन तसेच वर्गामधील आंतरक्रिया या विषयांचे अद्यावत ज्ञान विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे तसेच या विषयाचे ज्ञान आणि कौशल्य शिक्षकांना आत्मसात व्हावीत आणि त्याचा वापर विद्यार्थ्यांना या जागतिक स्तरावरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व्हावा या उद्देशाने दिव्य विद्यालय जव्हार येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर व शिक्षण विभाग पंचायत समिती जव्हार अंतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन पाच टप्प्यांमध्ये करण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक 11/.2/.2025 ते 15 /2/ 2025 रोजी दिव्य विद्यालय येथे संपन्न होत आहे.
तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना सदरील प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती विजयाताई लहारे यांनी शिक्षकांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले तसेच गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांनी शिक्षकांना प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.दिव्य विद्यालयाच्या संस्थापिका प्रमिलाताई कोकड यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले यावेळी पुंडलिक चौधरी शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा डांगे शिक्षण विस्तार अधिकारी किरण शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी तसेच सर्व केंद्रप्रमुख व बीआरसी कर्मचारी उपस्थित होते.या प्रशिक्षणाचे नियोजन डायट पालघर व शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे तर संतोष मुकणे हे प्रशिक्षण समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.