महाराष्ट्र
अकलूज शहरात पोलीसांची गस्त..वाहतुकीला अडथळा करणाऱ्या फेरी वाल्यावर होणार कायदेशीर कारवाई…

आमीर मोहोळकर
प्रतीनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज शहरातील वाहतुकीस व रहदारीस अडथळा करणारे फेरीवाले व रस्त्याच्या कडेला वाहन पार्किंग करणारे यांना योग्य ती समज देण्याकरता आज अकलूज येथील पोलिसां कडून गस्त करण्यात आली…

टाइम्स 9 शी बोलताना अकलूज पोलीस स्टेशन चे A P I विक्रम साळुंखे साहेब म्हणाले की,भविष्यात यापुढेही अशी गस्त सुरू राहणार आहे आणि न ऐकणारे फेरीवाले यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे…

API विक्रम साळुंखे यांनी अकलूज शहरात नवीन एसटी स्टँड,सदुभाऊ चौक,भाजी मंडई,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,महर्षी कॉलनी,पंढरपूर नाका,सुजय नगर,पोलीस स्टेशन अशी पायी पेट्रोलिंग करण्यात आली…

सदर गस्तच्या वेळी पोलीस ठाणे कडून API विक्रम साळुंखे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 25 पोलीस अंमलदार,25 होमगार्ड या गस्त मध्ये सामील होते…