महाराष्ट्र
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रंग खेळत धुळवड केली साजरी.

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी,
मोबाईल- 8378076123
नागरिकांनी रंग खेळताना कोरड्या रंगाचा वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा. नैसर्गिक रंगांनाच प्राधान्य द्यावे असे आवाहन माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी केले.

आज धुलिवंदन म्हणजे धुळवड राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येणारा लोकप्रिय सण म्हणजे धूलिवंदन होय. आज माजी राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी पुणे येथे ‘तळजाई टेकडी येथे सहकाऱ्यांच्या सोबत रंग खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकिर उपस्थित होते. त्यांच्यासह सहकाऱ्यांनी रंग खेळत धुळवड साजरी केली



