अकलूज चा सकल मुस्लिम समाज करणार नितेश राणे यांचा निषेध…
⛔ विराट जनसमुदायासह अकलूज येथील उपविभागीय कार्यालय येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना देणार निवेदन…
⛔ नितेश राणे विरोधात अकलूज चा मुस्लिम समाज आक्रमक…
प्रतिनिधी,आमीर मोहोळकर,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज : भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर येथे एका मोर्चाला संबोधित करत असताना मुस्लिम समाजा प्रती “तुमको मस्जिद मे घुसकर चुन चुन कर मारेंगे” असे प्रक्षोभक वक्तव्य केल्याने सबंध मुस्लिम समाज बांधवांची मने दुखावल्याने आणि नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तसेच नितेश राणे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी गुरुवार दिनांक 5/9/2024 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता अकलूज आणि परिसरातील सकल मुस्लिम समाज बांधवांनी उपविभागीय कार्यालय अकलूज येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने निवेदन देण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन माळशिरस तालुका मुस्लिम समाजाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेश “महासचिव” ॲड वजीर शेख यांनी केले…
ते टाइम्स 9 मराठी न्यूज च्या माध्यमातून सकल मुस्लिम समाजाला आवाहन करत असताना बोलत होते यावेळी नाराज असलेले असंख्य सकल मुस्लिम समाज बांधव हि उपस्थित होते…