महाराष्ट्र

माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा “बुरुज” ढासळला…?

खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि भावी आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वात करणार असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश…

प्रतिनिधी,आमीर मोहोळकर,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका कार्यकारणीतील असंख्य कार्यकर्ते खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि भावी आमदार उत्तमराव जानकर यांचे नेतृत्व मान्य करत येणाऱ्या सहा सप्टेंबर ला पिसेवाडी मुक्कामी एका भव्य कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श प) गटात प्रवेश करणार असल्याची माहिती पिसेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते साहिल आतार यांनी पत्रकार परिषदेत दिली…

पुढे बोलताना ते असे हि म्हणाले की,स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या विश्वासातील तालुका कार्यकारिणीतील संबंधित कार्यकर्त्यांनी कोणालाही विचारात न घेता कार्यकारणी बरखास्त केल्याने अनेक कार्यकर्ते नाराज होऊन आणि संघटनात्मक चळवळीत कोणालाही सामावून न घेतल्याने असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले…

राजू शेट्टीं यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघटनात्मक चळवळीमध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या स्वाभिमानांसाठी आम्ही लढा उभारला,वेळप्रसंगी आम्ही पोलिसांच्या लाट्या-काठ्या खाल्ल्या,पोलिस केसेस अंगावर पडल्या,जेलमध्ये बसलो तरी देखील न डगमगता आम्ही संघटनात्मक चळवळीत काम करत होतो,परंतु आम्हाला संघटनात्मक चळवळीत कसल्याच विचारात न घेतल्याने आमच्या मध्ये अन्याय झाल्याची भावना जागरूक झाल्याने आम्ही हा निर्णय घेत असून आमच्या सह असंख्य कार्यकर्ते शरद पवार साहेब यांच्या पक्षाचा पुरोगामी विचाराचा वारसा असल्यामुळे आम्हीं सर्व जण च प्रवेश करणार असल्याचेही ते म्हणाले…

कमलाकर माने देशमुख (तात्या ),मदनसिंह जाधव (माजी जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा स्वाभिमानी),अजित कोडग तालुकाध्यक्ष युवा आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना,साहील (भैय्या )आतार माजी विधानसभा अध्यक्ष,माळशिरस तालुका,सचिन देवकाते माजी तालुका कार्याध्यक्ष,माळशिरस स्वाभिमानी शेतकरी संघटना समाधान काळे,तेजस भाकरे यांच्या सह बहुसंख्य स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button