महाराष्ट्र

माळीनगर येथे राज्यस्तरीय सबजुनियर सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी…. रियाज मुलाणी
मो.9921500780

सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन व दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड, माळीनगर,दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी माळीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ३० व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर सॉफ्टबॉल स्पर्धेचे उद्घाटन दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे व एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉक्टर प्रदीप तळवेलकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

या उद्घाटनाप्रसंगी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अजय गिरमे,संचालक पृथ्वीराज भोंगळे ,तसेच प्राचार्य कल्लाप्पा बिराजदार व उपप्राचार्य रितेश पांढरे, गुलमोहर इं.स्कूलचे प्राचार्य वसंत आंबोडकर, उस्मान गणी शेख, अभय बीराज सांगली ,रामेश्वर राठोड अकोला, प्रसन्नजीत बनसोडे परभणी, संदीप लंबे कोल्हापूर, अभिजीत इंगोले अमरावती, संतोष साळुंखे सांगली श्रीकांत मदने कोल्हापूर, हर्षल मोरे नवी मुंबई अनिल धोत्रे धाराशिव गणेश बेटूदे ,संभाजीनगर हे उपस्थित होते.

दि.१४ व दि १५ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ३२ जिल्ह्यातून मुला व मुलींचे ३८ संघ सहभागी झाले. जवळ जवळ ६५० खेळाडू, पंच,पदाधिकारी, प्रशिक्षक,व्यवस्थापक उपस्थित आहेत. या स्पर्धा दिवसभर चालू आहेत.या स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने चालू आहेत.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून पंचप्रमुख जयंत जाधव जळगाव ,आकाश सराफ जळगाव, अक्षय येवले अहिल्यानगर, संतोष अवचार संभाजीनगर, व्यंकटेश झिपरे लातूर, जिशान शेख,निखिल घोडके सोलापूर पंच म्हणून काम पाहत आहे.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव प्रा.संतोष खेंडे, प्रशांत कदम, संतोष पाटील, क्रीडाशिक्षक रणजीत लोहार , संजय पवार,विरेश कुंभार, लोखंडे, सई कावळे, सुजित ठोसर, विकास नवगिरे, रवी सोनवणे, देविदास भोसले, सुनील यादव हे परिश्रम घेत आहेत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक रितेश पांढरे यांनी केले.सूत्रसंचालन राजेश कांबळे यांनी तर आभार सिद्धेश्वर कोरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button