महाराष्ट्र
मकबुल शेख यांचे अल्पशा आजाराने निधन

करमाळा प्रतिनिधी
आवाटी तालुका करमाळा येथील जगताप गटाचे कट्टर समर्थक तसेच मार्गदर्शक आवाटी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन मकबूल हसन शेख वय 75 यांचे सोलापूर येथे रुग्णालयात उपचार घेत असताना अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले सुना, नातवंडे असा परिवार आहे मकबुल शेख हे आवाटी तसेच परिसरात मास्तर या नावाने परिचित होते ते मित भाषी, तसेच मनमिळावू स्वभावाचे होते त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे ते आवाटी येथील सरपंच साबीर खान पठाण यांचे मामा होत त्यांच्यावर उद्या सकाळी त्यांच्या राहत्या गावी आवाटी येथे मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे दफन विधी करण्यात येणार आहे
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मकबुल शेख यांच्या निधनाचे दुःख व्यक्त केले आहे



