महाराष्ट्र

दिवाळीआधी करमाळा तालुक्यातील कारखान्यांनी ऊसाची तसेच इतर हि रक्कम त्वरित द्यावी….अन्यथा दशदशरथआण्णा कांबळे यांचा इशारा.

करमाळा-प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा तालुक्यामध्ये सध्या चार कारखाने आहेत. त्यातील दोन सहकारी तर दोन खाजगी कारखाने आहेत. यातील मकाई कारखाना आधीपासुनच ऊसतोडणी कामगार, शेतकरी, कामगार तसेच इतर ही काही कारणांनी अडचणीत आला आहे. आदिनाथ कारखान्याकडून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला परत एकदा योग्य भावासह लवकरात-लवकर पैसे मिळतील. अशी आशा पल्लवीत झाली होती. परंतु आदिनाथ कारखान्याच्या बाबतीत मागचे दिवस पुढे येण्यास उशीर लागला नाही. त्याचप्रमाणे भैरवनाथ, कमलाई व गोविंदपर्व गुळाचा कारखाना हे खाजगी कारखाने आहेत. यांना तर अक्षरशः शेतकऱ्यांचे बिल द्यायचे असते! हे जणु काही विसरुन गेले आहेत कि काय? असाच प्रश्न आता आम्हाला पडायला लागला आहे. अशाप्रकारचा प्रश्न शेतकरी-कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना कांबळे म्हणाले कि, करमाळा तालुक्यातील मुजोर कारखानदारांना, शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे ऊस दिला. ऊस दिल्यानंतर शेतकरी, वाहतुकदार, ऊसतोडणी कामगार यांचे बील कारखानदारांनी देणे बंधनकारक असताना देखील ऊसबील दिले गेले नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व समविचारी संघटनांना सोबत घेऊन, आम्ही कारखान्याचे संचालक तथा चेअरमन यांच्या दारात जाऊन, ‘ऊस बील द्या, शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा’. अशा घोषणा देत ‘भीक मांगो’ आंदोलन करणार आहोत. त्यामुळे ज्या कारखान्यांवर आर.आर.सी. अंतर्गत कारवाई झालेली आहे. अशा कारखान्यांवर कर्तव्यदक्ष तसेच गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याची भुमिका घेणाऱ्या करमाळा तहसिलदार शिल्पाताई ठोकडे मॕडम यांनी, कारखान्यांमधील साखर व मोलॕसिस मिळेल त्या भावात विक्री करुन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. त्याचप्रमाणे तालुक्यातील कारखानदारांनी कारखान्यामध्ये काम करत असलेल्या, सर्वच कामगारांचा दिवाळीआधी एक महिन्याचा पगार द्यावा. जेणेकरुन कामगारांची सुद्धा दिवाळी गोड होईल. अन्यथा कारखानदारांपासुन पिडित असलेल्या शेतकरी, कामगार, वाहतुकदार, कामगार यांना सोबत घेऊन ‘भीक मांगो’ आंदोलन करण्याचा इशारा कांबळे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button