पालघर केळवे-माहीम येथे उभारण्यात येणाऱ्या रिलायन्स टेक्स्टाईल पार्कच्या विरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील केळवे-माहीम टोकराले या परिसरातील 880 एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या रिलायन्स टेक्स्टाईल पार्कच्या विरोधात मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी केळवा-माहीम या पंचकोशीतील नागरिकांनी केळवे माहीम सरपंच, सेवा सोसायटी अध्यक्ष व स्थानिक नेते यांच्या उपस्थितीत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
आमचा पालघर जिल्हा विकू नका आमचा जिल्हा वाचवा कारण या पालघर जिल्ह्यात हजारो एकर सुपीक शेत जमीन, व या भागातील पर्यटन स्थळे , निसर्गरम्य ठिकाणे, स्वच्छ समुद्र किनारा अशा विविधतेने नटलेल्या पालघर जिल्ह्यातील केळवे-माहीम या भागातील 880 एकर जमिनीत हा प्रकल्प उभारल्यास संपूर्ण पालघर जिल्ह्यात प्रदूषण निर्माण होऊ शकते.
म्हणून शासनाने या प्रकल्पाला मान्यता देऊ नये तसेच शासनाच्या या एकतर्फी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध उपस्थित नागरिकांनी घोषणाबाजी करून राज्य शासन व जिल्हा अधिकारी यांच्या निषेध व्यक्त केला.
यावेळी या भागातील शेतकरी- बगायतीदार, केळवे माहीम पर्यटन व्यावसायिक, मच्छीमार बांधव, महिला पुरुष या सर्वांनी या भव्य मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.