महाराष्ट्र

वेळापूर येथे “पैगाम ए मुस्तफा” कॉन्फरन्स यशस्वी पार पडली :- उपसरपंच जावेद मुलाणी…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील मुस्लिम समाजा मधील युवकांनी आयोजित केलेल्या “पैगाम ए मुस्तफा” कॉन्फरन्स यशस्वी रित्या पार पडली असल्याची माहिती कॉन्फरन्स चे आयोजक उपसरपंच जावेद मुलाणी सर यांनी दिली,पुढे बोलताना ते असे हि म्हणाले की,माळशिरस तालुक्याचे भावी आमदार उत्तमराव जानकर यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासास पात्र राहत येथून पुढे हि कार्य करत राहणार असल्याचे हि ते म्हणाले…

पुढे बोलताना जावेद मुलाणी सर असे हि म्हणाले की,माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजातील युवकावर भावी आमदार उत्तमराव जानकर यांनी 2016/17 पासून जो विश्वास दाखवला आणि वेळापूर शहराची उपसरपंच पदाची जबाबदारी दिली त्यामुळेच मी “पैगाम ए मुस्तफा” सारखी भव्य कॉन्फरन्स आयोजित करू शकलो,त्यामुळेच उत्तमराव जानकर यांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे…

वेळापूर येथील मुस्लिम समाजाने आयोजित केलेल्या कॉन्फरन्स साठी माढा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली,या वेळी वेळापूर मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला…

“पैगाम ए मुस्तफा” कॉन्फरन्स साठी भावी आमदार उत्तमराव जानकर यांचे विशेष सहकार्य लाभले,या वेळी जीवन जानकर यांनी हि कॉन्फरन्स स्थळी भेट दिली,नवजवान संघटनेने त्यांचे हि स्वागत करुन जंगी सत्कार केला…

काल वेळापूर च्या नवीन बाजार तळ मैदान येथे माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील निवडक शहरातील अनेक मुस्लिम समाज बांधवांनी या “पैगाम ए मुस्तफा” कॉन्फरन्स ला हजेरी लावली…

यावेळी जवळ जवळ चार ते पाच हजार समाज बांधवांच्या जेवणाची सोय करण्यात आली असल्याची माहिती वेळापूर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष खुद्बुद्दीन कोरबू आणि वेळापूर ग्रामपंचायत चे उपसरपंच जावेद मुलाणी सर यांनी दिली…

वेळापूर येथे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने आयोजित केलेल्या “पैगाम ए मुस्तफा” कॉन्फरन्स ला “उत्तम” प्रतिसाद मिळाला,या वेळी हैद्राबाद येथील अहेमद नक्शबंदी आणि पूर्णिया बिहार येथील मुफ्ती मोहम्मद शेहरेयार यांची प्रमुख प्रवचने (बयान) झाली…

सदरची कॉन्फरन्स यशस्वी करण्यासाठी वेळापूर मुस्लिम समाजातील आणि माळशिरस तालुक्यातील मुस्लिम समाजातील समाज बांधवांनी तसेच वेळापूर येथील सर्वच समाज घटकातील युवकांनी प्रयत्न केले…

“पैगाम ए मुस्तफा” कॉन्फरन्स साठी वेळापूर ग्रामपंचायत आणि वेळापूर येथील सर्वच समाज घटकाचे विशेष सहकार्य लाभले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button