माळीनगर ग्रामपंचायतीने थकीत करापोटी महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनी उपकेंद्रावर केली कारवाई
प्रतिनिधि… रियाज मुलाणी
माळीनगर ग्रामपंचायतची महाराष्ट्र राज्य महापारेषण कंपनी उपकेंद्र माळीनगर ( ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 871) कडे सन 2007-08 पासून असलेल्या थकीत करपोटी जप्तीची कारवाई केली आहे.
सदरच्या कर आकारणी विरुद्ध महापारेषण केंद्र माळशिरस न्यायालयात अपीलात गेले, त्या नंतर ते जिल्हा न्यायालयात व गटविकास अधिकारी पं स माळशिरस यांच्याकडील अपिलाची सुनावणी होऊन ग्रामपंचायत च्या बाजूने निकाल लागला सदर निकालाच्या विरुद्ध स्थायी समिती सोलापूर यांच्या कडे अपिलात गेले तेथे ही ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल लागला.
सदरच्या महापारेषण केंद्राकडे पंचायतीची सन 2007-08 पासून आज अखेर रु 7765812/- थकीत कर येणे असून त्या बाबत ग्रामपंचायतीने वेळो वेळी कर मागणी बिल,मागणी लेख, व जप्ती वॉरंट बजावणी करूनही महापारेषण केंद्राकडून कराचा भरणा न केल्याने माळीनगर ग्रामपंचायतीने दिनांक08/ 12/2024 रोजी महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण केंद्रातील सहाय्यक अभियंता यांची खुर्ची,टेबल,व इतर साहित्य गावच्या सरपंच अनुपमा एकतपुरे,सदस्य विराज निंबाळकर, लक्ष्मण डोईफोडे,रूपाली तूपसौंदर्य, आसमा मुलाणी,यांच्या उपस्थितीत कैलास सुरवसे ग्रामपंचायत अधिकारी यांनी जप्त केले.
सदरच्या कराचा भरणा 7 दिवसात न केल्यास जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता ,उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनी मर्या सोलापूर यांच्याकडील उपकेंद्र माळीनगरच्या कराचा भरणा करणे आवश्यक आहे असे ग्रामविकास अधिकारी कैलास सुरवसे यांनी सांगितले.