करमाळा तालुक्याला निधीचा ओघ सुरूच …जिल्हा नियोजन मंडळातून 7 कोटी तर गट ब वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत 3 कोटी निधी मंजुरीचे आदेश…आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा तालुक्यासाठी आत्तापर्यंत 3 हजार 434 कोटींचा निधी उपलब्ध झालेला आहेच, त्याचबरोबर सध्या जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून जन सुविधा ,तीर्थक्षेत्र, नागरी सुविधा ,जिल्हा परिषद शाळा नवीन वर्गखोली बांधणे ,वर्ग खोल्या दुरुस्ती करणे, 30 54 ,50 54 इत्यादी कामांसाठी 6 कोटी, मत्स्य संचयन बीजसाठी 1 कोटी निधी प्राप्त झाला असून गट ब मधून रस्ते विकासासाठी 2 कोटी तर वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेअंतर्गत गावांतर्गत रस्ते विकासासाठी 1 कोटी असा जवळपास 10 कोटींचा निधी या आठवड्यात मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली .
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, करमाळा मतदार संघाच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून वेगवेगळ्या विभागामार्फत गावांच्या विकास कामांसाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देत आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून स्मशानभूमी शेड बांधणे ,स्मशानभूमी रस्ता करणे, स्मशानभूमी परिसर सुशोभीकरण करणे ,गावांतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीट करणे ,गटार बांधणे ,पेविंग ब्लॉक बसविणे, नवीन वर्गखोल्या बांधणे ,जुन्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती करणे, जिल्हा परिषद शाळा साठी शौचालय बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरण करणे, उजनी जलाशयामध्ये मत्स्यबीज सोडणे, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणे आदी विकास कामांसाठी 6 कोटी निधी जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध झालेला आहे.
गट ब मधून 2 कोटी निधी उपलब्ध झाला असून कात्रज, चिखलठाण, पोंधवडी, खांबेवाडी आदी दुर्लक्षित गावांचे रस्ते व पुलांची कामे या निधीमधून होणार आहेत. त्याचबरोबर वसंतराव नाईक तांडा सुधार योजना अंतर्गत 1 कोटी निधी प्राप्त झाला असून या निधीमधून साडे ,वडगाव ,पारेवाडी आदी गावांमधील कामे केली जाणार आहेत.