अकलूज येथे शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी दिल्या सांत्वनपर भेटी
प्रतिनिधी आमीर मोहोळकर टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क अकलूज
अकलूज येथील मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक जावेद बाबा तांबोळी यांचे मामा इनुस जमादार ( टेलर ) यांचे नुकतेच निधन झाले होते.माढा तालुक्याचे भावी आमदार शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी इनुस जमादार टेलर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सांत्वन पर भेट घेतली
तसेच अकलूज येथील मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते विनायक उर्फ लिंगराज गोसावी यांनी मागील तीन दिवसांपूर्वी खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी गोसावी कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची ही सांत्वन पर भेट घेतली.
माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील सतीश राव बाबा माने देशमुख यांच्या मातोश्रींचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते आज सकाळी युवा नेते शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या वेळापूर येथील निवासस्थानी सांत्वन पर भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.